Thursday, 10 August 2017
एकापेक्षा अधिक पॅनकार्ड; मग 'हे' करा
👉 _*एकापेक्षा अधिक पॅनकार्ड; मग 'हे' करा!*_
_
प्रत्येक ग्राहकाला पॅन कार्ड बँकेच्या खात्याशी जोडणे अनिवार्य करण्यात आल्यामुळे प्रत्येकाकडे नेमकी किती पॅन कार्डे आहेत, हे सरकारला कळणार आहे. त्यामुळे प्राप्तिकर कायदा कलम 272 बी नुसार ज्यांच्याकडे एकपेक्षा अधिक पॅनकार्डे आहेत, त्यांच्याकडून केंद्र सरकार 10 हजार रुपयांचा दंड वसूल करू शकते. म्हणून एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगणाऱ्यांनी नेमकं काय करायचं? तर त्यांनी उर्वरित कार्ड परत करण्याची गरज आहे. आज त्या त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात...
👉 1) पॅनकार्डच्या ऑनलाईन नोंदणी अर्जाच्या ठिकाणीच पॅन कार्ड परत देण्यासाठीचा अर्जही करावा लागतो. यासाठी प्रथम ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ अर्थात ‘एनएसडीएल’च्या वेबसाइटला भेट द्या. तेथे गेल्यानंतर https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकला क्लिक करा. त्यानंतर अॅप्लिकेशन टाईप मेन्यूमध्ये जाऊन PAN Changes or Correctionचा पर्याय निवडा.
👉 2) यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरा. यानंतर पुन्हा एक नवीन पेज उघडेल आणि टोकन क्रमांक समोर दिसेल.
👉 3) या पानाच्या वरील भागातील Submit Scanned images through e-sign वर क्लिक करून पॅन कार्डची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. त्यानंतर PANच्या कोष्टकात सर्व तपशील भरा; जे तुम्हाला जवळ बाळगता येतील.
👉 4) पुढील पेजच्या खालच्या बाजूला जाऊन तेथे जे पॅन कार्ड तुम्हाला परत करावयाचे आहे, त्याचे सविस्तर तपशील द्या. सर्व तपशील भरल्यानंतर Next या पर्यायावर क्लिक करा.
👉 5) त्यानंतर PAN रद्द करण्यासंदर्भातील सर्व माहिती भरून डाव्या बाजूसमोरील रकाने तपासा. जे पॅनकार्ड रद्द करायचे आहे, त्याचा आणि अन्य सारखे नाही ना याची खात्री करा.
👉 6) त्यानंतरच्या येणाऱ्या स्क्रीनवर ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा सादर करा. सर्व तपशील जमा केल्यानंतर संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासून पाहा. त्यानंतर पेमेंट करण्याचा पर्याय निवडा.
👉 7) जर, पॅनकार्डवरील पत्ता देशातील असेल तर प्रक्रिया शुल्क 110 रुपये आहे. मात्र, देशाबाहेरील पत्ता असल्यास 1 हजार 20 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क आपण डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट, डेबिट कार्ड, नेटबँकिंग आदी माध्यमांतून भरू शकता. जर आपण डिमांड ड्राफ्ट काढणार असाल, तर NSDL-PAN च्या नावासह Payable चे ठिकाण मुंबई असे नोंदवा. त्यामागे तुमचे नाव आणि Acnowledgment Number लिहा.
👉 8) शुल्क भरल्यानंतर आपल्या स्क्रीनवर Acnowledgment Number दिसेल. तो डाउनलोड करून प्रिंट जवळ ठेवा. त्यातील एक कॉपी NSDL-e Gov at 'Income Tax PAN Service Unit', NSDL, e-Governance Infrastructure Limited, 5th Floor, Mantri Sterling, Plot No. 341, Survey No. 997/8, Model Colony, Near Deep Bunglow Chowk, Pune - 411016 या पत्त्यावर पाठवा. जेणेकरून पुढील संदर्भासाठी त्याचा उपयोग होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
वल्लभ भाई पटेल (31 अक्टूबर, 1875 - 15 दिसंबर, 1950)
वल्लभ भाई पटेल भारत के स्वतंत्रता संग्राम सेनानी थे। भारत की आजादी के बाद वे प्रथम गृह मंत्री और उप-प्रधानमंत्री बने।# बारडोली सत्या...
-
क्रांतिकारी संघटना क्र. संघटना स्थापना ठिकाण संस्थापक १) व्यायाम मंडळ १८९६ पुणे चाफेकर बंधू २) मित्रमेळा १९...
-
ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित साहित्यकारो की सूची (वर्ष 1965 से 2017 तक) भारतीय ज्ञानपीठ न्यास द्वारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ भारतीय साह...
-
वल्लभ भाई पटेल भारत के स्वतंत्रता संग्राम सेनानी थे। भारत की आजादी के बाद वे प्रथम गृह मंत्री और उप-प्रधानमंत्री बने।# बारडोली सत्या...
No comments:
Post a Comment